Pune : सहकारात पक्षीय राजकारण होत नसते; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

no party politics in cooperatives Sharad Pawar pdcc election lose candidate forming party panel vikas dangat

विकास दांगट; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनीच पक्षाचा पॅनेल उभा करण्याचा घाट घातला

Pune : सहकारात पक्षीय राजकारण होत नसते; शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सहकारात पक्षीय राजकारण नसते असे सांगितले आहे. मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत माझ्याकडून पराभूत झालेल्या उमेदवारांनीच पक्षाचा पॅनेल उभा करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी केला.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गाटरकर यांनी विकास दांगट यांची हकालपट्टी केल्यामुळे दांगट यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती़. यावेळी ते बोलत होते. दांगट म्हणाले की, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हेच माझे नेते आहेत. ज्यांनी माझ्यावर राष्ट्रवादीतून हकालपट्टीची कारवाई केली आहे त्यांना कारवाईचा अधिकार आहे का?

तसेच त्यांना मी जास्त महत्व देत नाही. अशी टीका गाटकर यांचे नाव न घेता केली. हवेली तालुका हा पुणे शहराच्या आजुबाजुला पसरलेला आहे. येथे नात्यागोत्यांचे राजकारण चालते. सहकारात आजपर्यंत पक्ष आलेला नसल्याचेही दांगट यांनी सांगितले. आमच्या पॅनेलमध्ये सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. इतर महाविकास आघाडीलाही संधी दिली आहे. भाजपचा केवळ एकच उमेदवार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच आमचा पॅनल महविकास आघाडीचा असून निवडून आल्यानंतर आम्ही अजित पवार यांच्याकडेच जाणार आहोत असे देखील दांगट म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarelection