टोल नाक्यावरील रांगा टळल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

खेड शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर पुण्याच्या दिशेने रोज वाहणाऱ्या वाहनांच्या तुलनेत रविवारी (ता. ११) वाहनांची संख्या दुप्पट होती. मात्र, होणारी गर्दी लक्षात घेऊन या वेळी टोल प्रशासनाने वाहतुकीचे केलेले नियोजन यशस्वी ठरले. त्यामुळे रविवारी वाहनांची संख्या जास्त असूनही खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर वाहनांच्या रांगा लागल्याच नाहीत. 

खेड शिवापूर - पुणे- सातारा रस्त्यावर पुण्याच्या दिशेने रोज वाहणाऱ्या वाहनांच्या तुलनेत रविवारी (ता. ११) वाहनांची संख्या दुप्पट होती. मात्र, होणारी गर्दी लक्षात घेऊन या वेळी टोल प्रशासनाने वाहतुकीचे केलेले नियोजन यशस्वी ठरले. त्यामुळे रविवारी वाहनांची संख्या जास्त असूनही खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर वाहनांच्या रांगा लागल्याच नाहीत. 

दिवाळीच्या सुट्ट्या संपवून परतणाऱ्या नागरिकांमुळे दरवर्षी पुणे- सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, हे लक्षात घेऊन खेड- शिवापूर टोल प्रशासनाने या वेळी टोल नाक्‍यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन केले होते. टोल नाक्‍याच्या अर्धा किलोमीटर अलीकडे दोन ठिकाणी मोठी वाहने डाव्या बाजूने आणि छोटी वाहने उजव्या बाजूने सोडण्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून पुण्याकडे परतणारी वाहनांची संख्या वाढूनही टोल नाक्‍यावर गर्दी झाली नाही. त्यामुळे खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर प्रवाशांना सुखद अनुभव आला. पुणे- सातारा टोल मार्गाचे मुख्य व्यवस्थापक अमित भाटिया हे व्यवस्थापक बनवारीलाल शर्मा, बद्रीप्रसाद शर्मा, नाना कोंडे, श्रीनिवास राव, अभिजित गायकवाड यांच्यासह स्वतः सकाळपासून रस्त्यावर उतरून वाहतूक नियोजनाचे काम करत होते. हैंडहेल्ड मशिन आणि टोल कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली होती. जास्त वाहने पास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामुळे खेड- शिवापूर टोल नाक्‍यावर वाहनांच्या रांगा लागल्या नाहीत अन्‌ प्रवाशांना याठिकाणी सुखद अनुभव आला. रविवारी दिवसभरात पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे ७५ हजार होती. इतर दिवशी ही संख्या सुमारे ४० हजार असल्याचे टोल प्रशासनाने सांगितले. 

एकाच दिवशी मोठ्या संख्येने वाहने परतत असल्याने वाहतूक कोंडी होणार हे लक्षात घेऊन वाहतूक नियोजन केले. टोलच्या अर्धा किलोमीटर पाठीमागे मोठी आणि छोटी वाहने वेगवेगळी करून त्यासाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्या. यामुळे टोलवर वाहतूक कोंडी झाली नाही.
- अमित भाटिया, मुख्य व्यवस्थापक, पुणे- सातारा टोल रस्ता 

Web Title: No queues of vehicles at the khed shivapur tollnaka