Pune Rains : पुण्यात थंडीला सुरवात, पुढील 6 दिवस पावसाची विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे : शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच, दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होऊन ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. तर, सायंकाळनंतर तापमानात घट होऊन 18 अंश सेल्सिअसवर जाईल. त्यामुळे आता हळूहळू थंडीला सुरवात होत आहे.

पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या 'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. या वादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. तर, पूर्व मध्य आणि लगतच्या ईशान्य अबरी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. परिणामी शनिवारी (ता. 9) आणि रविवारी (ता. 10) कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. सोमवारनंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी तसेच मुंबई, पालघर परिसरात जोरदार पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात सर्वात कमी तापमान नगर येथे 14.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

किमान तापमान 18 अंशावर
पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता. 8) कमाल तापमान 31 तर, किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारपासून तापमान कमाल 31 आणि किमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्याकडून देण्यात आली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Rainfall for next 6 days in pune