साद मिळेना ‘प्रतिसाद’ला

साद मिळेना ‘प्रतिसाद’ला

पिंपरी - महिलांच्या सुरक्षेसाठी पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी सुरू केलेले ‘प्रतिसाद’ हे ॲप प्रतिसादाअभावी बंद पडले आहे. किंबहुना, पोलिस प्रशासनाकडूनच त्याला साद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महिलेवर अतिप्रसंग ओढवल्यास त्या महिलेपर्यंत तत्काळ मदत पोचावी, या दृष्टीने हे ॲप विकसित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जानेवारी २०१३ मध्ये नागपूरमध्ये त्याचे उद्‌घाटन केले होते. त्यानंतर राज्यातील प्रत्येक शहरात हे ॲप सुरू केले होते. त्याची जनजागृतीही केली. मात्र, सद्या ते बंद आहे. या ॲपमधील संबंधित बटण दाबल्यानंतर ती व्यक्ती अडचणीत असल्याचा संदेश येतो. मात्र, त्यानंतर फोन येत नाही. या ॲप संदर्भात पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे माहिती उपलब्ध नाही. 

...असे होते ‘प्रतिसाद’
महिलांसाठी २४ तास ही सेवा होती. ॲपवरील लाल बटण दाबल्यास कंट्रोल रूमवरून हा संदेश स्थानिक चौकीला जात असे. त्यानंतर पोलिसांचा संबंधित महिलेला आपण पोचत असल्याचा फोन येत असे. यामुळे महिलांमध्ये अल्पावधीतच हे ॲप लोकप्रिय झाले होते. ‘‘पोलिसांच्या मागणीवरून आम्ही ‘प्रतिसाद’ ॲप तयार केले होते. त्यानंतर त्याचे सर्व अधिकार पोलिसांकडे दिले होते. त्यामुळे ‘ॲप’ बंद असल्यास पोलिसांनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे,’’ असे युनिक गार्ड इंडिया प्रा, लिमिटेडचे ॲप विकसक शशांक देशपांडे यांनी सांगितले.

‘प्रतिसाद’ ॲप कोणत्या कारणास्तव बंद आहे, याबाबतची माहिती नाही. ती महाराष्ट्र सायबर सेलकडून घेऊ. लवकरच आम्ही महिलांसाठी संकेतस्थळ व इतर सुविधा सुरू करणार आहोत. 
- डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com