पिंपरी-चिंचवड शहरात सुरक्षा अधिकारीच नाही

PCMC
PCMC

पिंपरी - शहरात बीआरटी, उड्डाण पूल, मोठे रस्ते झाले. शहराचा विस्तार झाला. ही सर्व विकासकामे सुरक्षित पद्धतीने सुरू आहेत की नाहीत, यासाठी सुरक्षा अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहरालाच अद्यापही स्वतंत्र सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) मिळालेला नाही.

फुगेवाडीच्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागला. बीआरटी मार्गावरही अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. उड्डाण पुलांच्या कामामध्येही मोठी जोखीम पत्करून कामगारांना काम करावे लागत आहे. सांडपाणी वाहिनीच्या कामाच्या वेळी छोटे-मोठे अपघात ओढवले जात आहेत. शहरात दहा ते पंधरा मजली टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कामांवर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे कोणतीही पाहणी न करता त्याचे काम करणारे अभियंता व संबंधित अधिकारी यांनाच जबाबदार धरले जाते. यासाठी महापालिका स्तरावर सुरक्षा अधिकारी पद निर्माण करणे गरजेचे आहे, अशी चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे.

बांधकाम सुरक्षेसाठीचे अधिकारी दर्जाचे पद असते. तसेच सुरक्षा सुपरवायझर, कन्सल्टंट व पर्यावरण सुरक्षा अधिकारीही पदही यामध्ये येते. ही पदे देखील महापालिकेकडे उपलब्ध नाही. या सर्व पदांच्या व्यक्तींना शहरातील नवीन सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेणे गरजेचे असते. अग्निशामक विभागातही स्वतंत्ररीत्या हे पद भरले जाते. मात्र, महापालिकेत हे पद रिक्त आहे.

शहरातील विकासकामांवर सुरक्षा अधिकाऱ्यांची सूक्ष्म नजर असते. त्यांची परवानगी घेऊनच काम सुरू करण्याचा परवाना संबंधिताला दिला जातो. तपासणी अहवालही संबंधित मालकाला दिला जातो. कामात त्रुटी आढळल्यास तत्काळ काम बंद करण्याचे आदेशही दिले जातात, असे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.

शहरात घडलेली दुर्घटना पाहता आता हे पद निर्माण करणे अत्यावश्‍यक झाले आहे. महापालिका अथवा शासनस्तरावरून या पदाची भरती करणे आवश्‍यक आहे. शहराचा विस्तार झाला असून, सर्व ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियंत्रण असणे आवश्‍यक आहे.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), दक्षता विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com