पुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी 'PFI' कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

पुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी 'PFI' कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाही

पुणे : पुणे : येथे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती, यामुळे कोणत्याही व्यक्ती विरुद्ध देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याच्या व्हायरल व्हिडिओ नंतर पुणे पोलिसांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे पोलिसांनी सांगितेल.

हेही वाचा: ...तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

यामुळे आता पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात कलम 153 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 चीतावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब कट तयार करणे अशा कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडून नवीन कलमं कुठली दाखल केली याबद्दल प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात आता ही तीन कलम आधीच्या गुन्ह्यात नव्याने जोडली गेली आहेत.

हेही वाचा: मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली 'ही' नवीन SUV, वाचा डिटेल्स

पुण्यातील 'पीएफआय' च्या निदर्शनांदरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांवर बोलताना दोन वेगवेगळे व्हिडीओ आले असून त्यांची चौकशी केली जाईल पण महाराष्ट्रात कोणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान त्यानंतर पुणे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले राजद्रोहाचे गुन्हे रदद् करण्यात आले आहेत. राजद्रोहाचा गुन्हा रद्द केल्याची माहिती पुणे शहरातील बंड गार्डन पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: बापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्ती