स्थलांतर नको; विस्तारीकरण हवे!

मार्केट यार्ड : स्थलांतराबाबत व्यापारी, अडत्यांची भूमिका
No shifting Need expansion market yard shard pawar pune
No shifting Need expansion market yard shard pawar pune sakal

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डाचे स्थलांतर करण्यापेक्षा बाजारपेठेच्या विस्तारीकरणावर प्रशासनाने भर द्यायला हवा. व्यापाराची प्रगती होण्यासाठी सरकारने इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्या जागेत माल साठवणूक, पॅकिंग, कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस करता येईल. अतिरिक्त जागेमुळे व्यापाऱ्यांना ऑनलाइन स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सज्ज होता येईल, अशी भूमिका मार्केट यार्डातील व्यापारी, आडत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

मार्केटयार्डात घाऊक बाजारपेठेचे कामकाज १ एप्रिल १९५९ पासून सुरू झाले. सुरुवातीला शहराच्या बाहेर असलेली ही बाजारपेठ आता शहराच्या मध्यभागात पोचली आहे. या बाजारपेठेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून येथे येथे दररोज सुमारे ५ हजार टन शेतमाल येतो, तर १२ हजार वाहनांची वाहतूक होते. या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डच्या स्थलांतराची वेळ आली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यामुळे आता बाजारपेठेत उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

मार्केटयार्ड स्थलांतराची गरज का?

  • वाढत्या लोकसंख्येमुळे बाजार अपुरा

  • माल साठवणुकीला पुरेशा जागेचा अभाव

  • शिवनेरी रस्ता, नेहरू रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी

  • पार्किंगला जागा अपुरी

  • जड वाहनांची वाढती वर्दळ

  • व्यापारासाठी पुरेशा पायाभूत सुविधांची वानवा

विस्तारीकरण का हवे?

  • व्यापारी, अडते, ग्राहकांची वाढती संख्या

  • नवीन जागेत पॅकिंग, कोल स्टोरेज,

  • वेअर हाऊस तयार करणार

  • शहराला छोट्या वाहनातून माल पुरवठा करणे सोयीचे

  • शहरात येणारी जड वाहने कमी होण्यास मदत

  • वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मदत

  • अतिरिक्त जागेमुळे व्यापाऱ्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सज्ज होता येईल

फळ-भाजीपाला विभाग

  • ९०० - अडते

  • १५ कोटी रुपये - रोजची आर्थिक उलाढाल

  • १५ हजार - खरेदीसाठी रोज येणारे नागरिक

  • ६ हजार - कामगार

गूळ भुसार बाजा

  • ३ हजार - व्यापारी, कामगार

  • ५ हजार - खरेदीसाठी रोज येणारे नागरिक

  • ५ कोटी रुपये - रोजची आर्थिक उलाढाल

दररोजची वाहतूक

  • ५३५० - जड व तीन चाकी वाहनांची संख्या

  • १८५० - शेती माल घेऊन येणारी

  • ७ हजार - दुचाकींची वाहने

  • ३५०० - शेतीमाल व धान्य खरेदीसाठी येणारी वाहने

पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांचा विस्तार, विकास व संभाव्य रिंग रोड विचारात घेता मार्केट यार्डमधील माल वाहतूक, लोडिंग, अनलोडिंग, गाड्यांचे पार्किंग आदींची व्यवस्था शहराच्या बाहेर होणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शहराबाहेर बाजारपेठेसाठी जागा संपादित करने आवश्यक आहे. त्या ठिकाणी गोदाम, कोल्ड स्टोरेज उभारून साठवणूक करता येईल. त्यातून मार्केटयार्डमधील वाहतूक व ताण कमी होईल.

- मधुकांत गरड, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

शहराला मालाचा पुरवठा करण्यासाठी सध्याचे मार्केट यार्ड अपुरे पडत आहे. ई-कॉमर्स व ऑनलाइन व्यापार वाढला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या शहराबाहेर मोठे गोडाऊन घेऊन तेथूनच ग्राहकांना मालाचा पुरवठा करत आहेत. सध्या ऑनलाइन व्यापार वाढला आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी बाजारपेठेसाठी रिंग रोड लगत वाढीव जागा मिळाल्यास व्यापाऱ्यांना ई-कॉमर्सप्रमाणे अन्नधान्यासह इतर वस्तू ग्राहकांना देणे शक्य होईल.

- राजेंद्र बाठिया,अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर

भविष्याचा विचार करून मार्केट यार्डला जास्त जागेची गरज पडणार आहे. त्यामुळे पारंपरिक व्यापाऱ्यांना सोईनुसार गोडाऊन बांधकाम करता येईल. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल. तसेच यामुळे मार्केट यार्डातील गर्दी कमी होण्यासही मदत होईल. राज्य सरकारने त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.

- राजेश शहा,माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com