#PunePublicTransport ना एसटी सेवा ना पीएमपी बस 

#PunePublicTransport ना एसटी सेवा ना पीएमपी बस 

पुणे - शहरापासून सुमारे ३० किलोमीटरच्या मार्गांवरील सेवेतून एसटीने अंग काढून घेण्यास सुरवात केल्यामुळे पीएमपीवर ताण येऊ लागला आहे. परिणामी एसटीचीही सेवा नाही अन्‌ पीएमपीकडेही पुरेशा बस नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने दररोज प्रवासी भरडले जात आहेत. 

खेड शिवापूर, खानापूर, कोंढणपूर आदी मार्गांवर मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ दरम्यान एकही बस सुटली नाही, त्यामुळे प्रवासी संतप्त होऊन त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आढावा घेतला असता, एसटीचे जवळच्या अंतराचे मार्ग बंद होत असल्यामुळे पीएमपीवर त्याचा ताण येत असल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे. सासवड, राजगुरुनगर, पौड, कोंढणपूर, चाकण, घोटावडे, पिरंगुट, भूगाव, लोणी काळभोर, उरुळी कांचन, तळेगाव, शिक्रापूर, कामशेत, तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी पीएमपीचीही सेवा आहे. या मार्गांवर एसटीकडूनही यापूर्वी नियमित बस होत्या. परंतु, आता त्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवाशांना ते परवडत नाही अन्‌ त्यांची संख्याही कमी आहे. पीएमपीकडे बसची संख्या कमी आहे. त्यामुळे या मार्गांवर पुरेशा बस सोडता येत नाहीत. परिणामी प्रवासी त्रस्त झाले आहेत.

एसटीकडून जवळच्या मार्गावर सेवा बंद
पुरेशा बस नसल्याने पीएमपीवर मर्यादा
सामान्य प्रवाशांच्या समस्या गंभीर

पीएमपीकडे बसची संख्या सध्या कमी आहे. त्यातच ठेकेदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्यांपैकी सुमारे १५० बसही बंद आहेत. एसटीनेही जवळच्या अंतराची सेवा मर्यादित केली आहे. त्यामुळे त्याचाही भार पीएमपीवर पडत आहे. नव्या बस आल्यावर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. 
- डी. एम. माने, विभागप्रमुख, पीएमपी वाहतूक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com