#PmcIssues ...अशी ही बनवाबनवी

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - शहरभरातील मोकळ्या जागा, टेकड्या आणि सोसायट्यांमध्ये शेकडो झाडे लावल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने हिरव्यागार झाडांच्या नावाखाली नुसतेच कागद ‘काळे’ केल्याचे उघड झाले आहे. मुळात महापालिकेच्या दाव्याइतकी मोकळी जागा शोधूनही कुठेही सापडणार नाही, तेव्हा इतकी झाडे लावली कशी, याचा शोध घेतला असता, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी फोटोसेशनपुरतेच वृक्षारोपण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ना मोकळ्या जागा ना सोसायट्यांत हिरवाई दिसली. मात्र वृक्षारोपणावरून महापालिकेने ‘अशी ही बनवाबनवी’ केल्याची बाब लपून राहिलेली नाही. 

मतदारांना खूष करण्यासाठी बहुतांशी नगरसेवकांनी आपापल्या भागातील सोसायट्यांमध्ये झाडे लावण्याचा प्रयत्न केला. पण हुशार रहिवाशांनी तो हाणून पाडला आणि नगरसेवकांना बजाविलेही. ‘सोसायटीत आता झाडे लावता. मात्र त्यांच्या फांद्या तोडायच्या असतील तर तुमचे अधिकारी पैसे मागतात,’ अशा शब्दांत रहिवाशी नगरसेवकांना सुनावतात. त्यामुळे सोसाट्यांमध्ये तरी किती झाडे लावली असावीत, असा प्रश्‍न आहे. 

महापालिकेने तब्बल ११ हजार ६०० झाडे लावल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जी महापालिका प्रत्येक कामात तोंडदेखलणा करते, तिला पर्यावरणाची इतकी आपुलकी असेल का, अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यामुळे खरोखरीच नेमकी कुठे आणि किती झाडे लावली आहेत, त्याचा शोध घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. महापालिका प्रशासनाने सांगितलेल्या दहा ठिकाणी पाहणी केली. त्यात, पर्वती, कोथरूड, मुंढवा, हडपसर, कर्वेनगर, धनकवडी आणि सिंहगड रस्त्यांवरील मोकळ्या जागा आणि काही सोसाट्यांचा समावेश आहे. या भागातील प्रत्यक्ष वस्तुस्थिती तर फारच निराळी आहे. आमच्या सोसायटीत गेल्या तीन-चार वर्षांत वृक्षारोपण झाले नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

ठरलेले उत्तर तळजाई !  
नेमकी कोणत्या भागात झाडे लावली, या प्रश्‍नावर महापालिकेचे एकमेव ठरलेले उत्तर म्हणजे, तळजाई पठार. त्यामुळे पहिल्यांदा तेथे जाऊन माहिती घेतली, तर गेल्या चार वर्षांत एकही झाड महापालिकेने लावलेले नाही. पाच वर्षांपूर्वी ही झाडे लावल्याचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रशासन जे काही सांगते, त्यानुसार एकाही जातीचे झाड तेथे सापडले नाही. त्यामुळे तळजाईवरील जुन्या झाडांचे भांडवल प्रशासन करीत आहे. 

झाडे मिळतात, ती लावण्याचा तगादा प्रशासनाचा असतो. त्यामुळे सोसायट्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असतो. मात्र सोसायटीत झाडे लावल्यानंतर प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सोसायट्यांमध्ये वृक्षारोपणाला विरोध होताे. या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कर्मचारी पैसे मागत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
- राजेश बराटे, नगरसेवक

Web Title: No tree plantation in PMC