पुण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - महापालिकेच्या विविध पाणीपुरवठा केंद्र आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे येत्या शुक्रवारी ( ता.7)) शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ( ता. 8) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर-पंपिंग), रॉ वॉटर, एसएनडीटी या जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत; तसेच लष्कर जलकेंद्रात महावितरणतर्फे विद्युतविषयक कामे करण्यात येणार असल्याने या जलकेंद्रातून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केले आहे. 

Web Title: No water supply on Friday in pune

टॅग्स