पुण्यातील पोलिस वसाहतीत दोन दिवस पाणीच नाही

tap
tap

पुणे : स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे पोलिस कुटुंब पोलिस आयुक्तलयामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली कैफीयत मांडणार आहेत. 

स्वारगेट येथील नेहरु स्टेडीयमजवळील पाण्याचा वॉल्व खराब झाल्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. शनिवार व रविवारी महापालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्यामुळे खराब वोल्व्ह दुरुस्त करण्यात आला नसलयाचे उत्तर पोलिस कुटुंबांना मिळाले आहे. "शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस 24 तास उपलब्ध होत असतील, तर पाणी पुरवठा केंद्र कर्मचाऱ्यांनी खराब वोल्व्ह दुरुस्त करु नये का? असा प्रश्न पोलिसांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

वरिष्ठ अधिकारी देखील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, त्यामुळे आमची व्यथा मांडायची तरी कोणाकडे? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com