महावीर जयंतीनिमित्ताने अहिंसा रॅलीचे आयोजन

दादावाडी जैन मंदिर येथून दुपारी चार वाजता ४०० दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला
mahavir jayanti
mahavir jayantisakal

महर्षी नगर : भगवान महावीर स्वामी यांच्या २६२१ व्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्त जैन सामुदायिक उत्सव समिती च्या वतीने अहिंसा टु व्हीलर रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

रॅलीचा शुभारंभ आचार्य परमपूज्य विजय प्रभाकर सूरीश्वरजी यांच्या मंगल पाठ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन दादा जोशी, अभय छाजेड, काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, भाजपा नगरसेवक प्रवीण चोरबोले, पुण्यातील प्रसिध्द उद्योगपती रविंद्र दुगड, सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष आचल जैन, विजयकांत कोठारी, विजय मरलेचा, वी.पी जैन, बाळासाहेब धोका संजय चोरडिया, सुनील लोढा, अनिल भन्साळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.

दादावाडी जैन मंदिर येथून दुपारी चार वाजता ४०० दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला, या रॅली मध्ये चंद्रकांत दादा पाटिल यांनी जिप्सी गाडीमध्ये बसून गंगाधाम पर्यंत जैन बंधू आणि भगिनींचे प्रोत्साहन वाढविले. रॅली काढण्याचा उद्देश जिओ और जिने दो या तत्वावर व अहिंसेच्या मार्गावर चालने हा होता.

रॅलीचा मार्ग सारसबाग येथून लक्ष्मीनारायण चौक, महर्षि नगर, मार्केट यार्ड, बिबेवाडी, गंगाधाम येथून नाजुश्री मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये चारशेहून अधिक दुचाकिंचा समावेश होता यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती. रॅलीचे आयोजन संदीप भंडारी, महेंद्र सुंदेचा मुथ्था, भरत भुरट,भरत सुराणा, सौरभ धोका, निमेश शाह, निखिल मुनोत, प्रकाश बोरा, तुषार मुथ्था,आनंद गादीया,पंकज बाफना, उमेदमल धोका आदि ने केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com