'नॉनफ्लिक्‍ट' आता मराठीत; संघर्षावर करा मात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

पुणे : संघर्ष, मग तो वैयक्‍तिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा इतर कोणताही असो...नेहमीच तणावदायक असतो. प्रगतीचा मार्ग रोखणारा, विकासाला खीळ घालणारा हा ताण कमी करण्यासाठी मुळात संघर्षावर सकारात्मक पद्धतीने मात करता यायला हवी. त्यासाठी नेमके काय करता येईल, यावर भाष्य करणारे आणि लक्षावधी वाचकांची पसंती लाभलेले पुस्तक म्हणजे 'नॉनफ्लिक्‍ट'.

विख्यात समुपदेशक आणि व्याख्याते आमीर कफीर व स्टीफन हिचेट या लेखकद्वयींनी लिहिलेल्या या पुस्तकाचा दर्जेदार मराठी अनुवाद माधुरी तळवलकर यांनी केला आहे. "सकाळ प्रकाशना'चे हे पुस्तक आता राज्यातल्या प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. दैनंदिन परिस्थितीतील संघर्षावर विधायक पद्धतीने मात करून शांतता
प्रस्थापित करण्याची कला म्हणजेच नॉनफ्लिक्‍ट. संवादातून समन्वयाकडे आणि तेथून पुढे शांततेकडे नेणारा हा प्रवास या पुस्तकात सोप्या भाषेत, सोदाहरण वर्णिला आहे. सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी नॉनफ्लिक्‍ट कार्यपद्धती वापरणाऱ्या "सकाळ-तनिष्का'सारख्या विधायक उपक्रमांची माहिती ही या पुस्तकाचे बलस्थान आहे.

'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या द्रष्ट्या विचारांतून महिलांसाठी कार्य करणारा तनिष्का गट, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) असे विविध कार्यगट तयार झाले. तनिष्का गटातील सभासद स्त्रियांनी दैनंदिन स्तरावरील संघर्ष सोडविण्यासाठी नॉनफ्लिक्‍ट पद्धतीचा वापर कसा केला व त्याचा विधायक परिणाम कसा झाला, हे प्रत्यक्ष वाचण्याजोगे आहे. नॉनफ्लिक्‍ट पद्धती वापरून लेखकद्वयींनी दैनंदिन स्तरावर शांतता कशी प्रस्थापित केली, याबद्दलचे अनुभवही प्रत्ययकारी आहेत. पुस्तकाची किंमत 160 रुपये असून हे पुस्तक 'सकाळ'च्या मुख्य कार्यालयात, सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे; तसेच www.sakalpublications.com व amazon.in वर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-24405678 किंवा 8888849050 (सकाळी 10 ते सायं. 6)

Web Title: nonflict book now in marathi