हा अपघात नाही तर घातपात

Raskar
Raskar

वडगाव निंबाळकर (पुणे) : बारामती तालुक्यातील आंबी बुद्रुक येथे रोहित्राला चिटकून मृत्यू पावलेल्या तरूणाचा अपघात नसुन घातपात झाल्याची माहिती समोर आली आहे. 

सोमनाथ पोपट रासकर (वय 23, रा. आंबी बद्रुक ता. बारामती) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोपट जोतीबा रासकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. गुरूवार (ता. 8) दिवाळी सणा दिवशी सोमनाथचा मृतदेह शेतातील विद्युत रोहित्रा जवळ आढळुन आला. हातात तारा असल्याने विजेच्या धक्याने मृत्यु झाल्याची माहिती गावात पसरली. बुधवार (ता. 7) रात्री हा प्रकार झाला असावा. पोलिसांनी घटना स्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात आनला असता खून झाल्याची माहिती पुढे आली कोणी तरी जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी बनाव केल्याचा प्रकार पोलिसांच्या नजरेत आल्याने वेगाने तपासाची सुत्रे फिरवली आहेत. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास बडवे यांनी दिली.

गरीब कुटुंबातील शेतमजुर असलेल्या सोमनाथचा खुन कोनत्या कारणास्तव झाला याबाबत तर्क वितर्क परिसरात लावले जात आहेत. मयत सोमनाथला पत्नी एक लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे.  कुटुंबातील तो कर्ता होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com