उड्डाणपुलाचे सुरू न करण्याची आढळरावांची सूचना

कृष्णकांत कोबल
शनिवार, 28 जुलै 2018

मांजरी :  मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील रस्त्याला सक्षम पर्याय म्हणून सध्याच्या गेट शेजारील जुन्या गेटच्या जागेचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती मिळून सक्षम पर्याय मिळेपर्यंत पुलाचे काम सुरू न करण्याची सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.

मांजरी :  मांजरी बुद्रुक येथील रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील रस्त्याला सक्षम पर्याय म्हणून सध्याच्या गेट शेजारील जुन्या गेटच्या जागेचा वापर करता येणे शक्य आहे. त्याबाबत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. ही माहिती मिळून सक्षम पर्याय मिळेपर्यंत पुलाचे काम सुरू न करण्याची सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.

येथील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन वर्ष मांजरी रेल्वे गेट व रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी रस्ते, योग्य अंतरावर, सक्षम व वाहतुकीला न्याय देणारे नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतपाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज गेट व पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

माजी आमदार महादेव बाबर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, अभियंता नकुल रणसिंग,  जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, नगरसेवक नाना भानगिरे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, उपसरपंच अमित घुले,  माजी सरपंच पुरूषोत्तम धारवाडकर, सदस्य  निलेश घुले, संजय धारवाडकर, सुमित घुले, समीर तुपे, अमोल हरपळे, राम खोमणे, रविंद्र गोगावले, संगिता घुले, शंकर घुले, विजय कामठे आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, "हा उड्डाणपूल व्हावा यासाठी 2010 पासून मी पाठपुरावा केला आहे. काम गतीने व वाहतूक बंद न ठेवता होणे आवश्यक आहे.  सध्याच्या गेटच्यापूर्वी जिथे गेट होते त्याठिकाणी ते सुरू करून पर्यायी रस्ता होऊ शकतो. दुचाकी व हलक्या वाहतुकीला तो फायदेशिर राहील. रेल्वे विभागाचे अधिकारी येथे पाहणी करून अहवाल सादर करतील. त्यानंतर हा अहवाल अधिवेशनात मंजूर करून त्यापध्दतीने कामाला गती देता येईल. तोपर्यंत बांधकाम विभागाने काम सुरु करू नये.'

माजी आमदार बाबर म्हणाले,"येथील संपूर्ण वाहतूक बंद करण्याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे खासदारांनी सुचविल्याप्रमाणे गेटचे स्थलांतर होऊन पर्यायी रस्ता करेपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरू करू नये, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.'

माजी सरपंच धारवाडकर म्हणाले, "सध्याच्या गेटच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर रंगीचा ओढा ते घावटे बंगला व कल्याणी शाळा ते थेट सोलापूर महामार्ग अशी वाहतूक वळविणे सोयीचे होईल.' 
"सध्या सुरू असलेल्या दोन्ही पर्यायी रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नियमितपणे नेमणूक करण्यात यावी.' अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले व ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले यांनी यावेळी केली.

Web Title: not being able to start the flyover : Adhalrao Patil