भाजपकडून लोकशाही नव्हे, तर ठोकशाही : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

कात्रज - सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून मेट्रोचे साठ टक्के वसूल केले जाणार असताना क्रेडिट मात्र पंतप्रधानांना. मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पवारसाहेबांना बोलायची संधी नाही. ही लोकशाही नव्हे, तर भाजपची ठोकशाही आहे, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

बालाजीनगर येथे माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे आणि नगरसेविका सुवर्णा पायगुडे यांच्या प्रयत्नातून महापालिकेने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतीगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात पवार बोलत होते.

ते म्हणाले, ""बारामती व पिंपरी येथे एकहाती सत्ता होती. त्या ठिकाणी विकासकामे सढळ हाताने करता आली. पुण्यात तशी स्थिती नसतानाही विकासकामांचा डोंगर उभा केला; मात्र त्याचा टेंभा कधी मिरवला नाही. भाजपचे आठ आमदार असताना शहरासाठी गेल्या अडीच वर्षांत काय केले, हे त्यांनी सांगावे. जाहिरातबाजीशिवाय या सरकारने काहीच केलेलं नाही. शिवस्मारक भूमिपूजनाच्या जाहिरातीसाठी अठरा कोटी रुपयांचा चुराडा केला.''

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ""गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडायचा झाला, तर अहवाल कमी पडतील. गेल्या 57 वर्षांत 90 उद्यानं उभारली होती. गेल्या दहा वर्षांत 85 उद्याने उभारली गेली. राज्यात सर्वांत जास्त नाट्यगृहं पुण्यात उभारली गेली. "सोशल मीडिया'च्या मागे धावून याआधी फसला आहात. आता फसू नका. आघाडीच्या काळात केंद्राने शहराला 2800 कोटी दिले. आताच्या सरकारने केवळ पंधरा लाख दिले. याचा अभ्यास नागरिकांनी करावा.''

दत्ता धनकवडे यांनी प्रभागात केलेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृह नेते शंकर केमसे, सुभाष जगताप, अप्पा रेणुसे, विशाल तांबे, भारती कदम, मोहिनी देवकर, प्रकाश कदम, बापूसाहेब धनकवडे, आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी उपस्थित होते.

Web Title: This is not democracy : Ajit Pawar