लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाला म्युकरमायकोसिस नसतो!

डोकेदुखी, डोळा लाल होणे, त्याला खाज सुटणे किंवा पाणी येणे ही लक्षणे असणाऱ्या प्रत्येकालाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे निदान होतेच असे नाही.
Mucormycosis
MucormycosisSakal

पुणे - डोकेदुखी, डोळा लाल होणे, त्याला खाज सुटणे किंवा पाणी येणे ही लक्षणे असणाऱ्या प्रत्येकालाच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराचे निदान होतेच असे नाही. तसेच, हा आजार संसर्गजन्य (Contagious) नाही. त्यामुळे ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी (Patient) घाबरून न जाता योग्य वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टरांनी (Doctor) केले आहे. (Not Everyone with Symptoms has Mucormycosis)

शहर आणि परिसरात महिनाभरापासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा आजार झाल्याचे निरीक्षण नोंदले जात आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या यात मोठी आहे. त्यामुळे या आजाराची धास्ती अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. सतत डोकेदुखी, डोले लाल होणे, त्यातून पाणी येणे ही लक्षणे दिसताच म्युकरमायकोसिस झाल्याने रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

Mucormycosis
पुढील 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज

याबद्दल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रमेश मुर्ती म्हणाले, ‘‘काळी बुरशी हा आजार बहुतांश रुग्णांनी यापूर्वी ऐकलेला नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये याची भीती निर्माण होते. या भीतीतून म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेला रुग्ण तपासणी करण्यासाठी येतो. ही लक्षणे असणाऱ्या प्रत्येकालाच म्युकरमायकोसिसचे निदान होत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे हा आजार झालेल्या रुग्णाला इतरांपासून दूर ठेऊ नये.’’

कोरोनानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांना हा आजार होतो. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोगाच्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता असते. त्यांच्यातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, हे त्यामागचे कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्याच प्रमाणात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे.

- डॉ. रमेश मुर्ती, नेत्ररोगतज्ज्ञ

माझ्या आईला कोरोना झालेला होता. त्यानंतर सातत्याने डोकं दुखत होतं. नंतर डोळे लाल झाले. त्याच वेळी म्युकरमायकोसिसच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला. रुग्णाची तपासणी केली. पण, त्यातून म्युकरमायकोसिस नसल्याचे स्पष्ट झाले.

- अंजली कदम, रुग्णाचे नातेवाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com