नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

पुणे-  केंद्र सरकारच्या पाचशे, हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शहरातून डेक्कन जिमखाना ते स. प. महाविद्यालय दरम्यान रविवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.

पुणे-  केंद्र सरकारच्या पाचशे, हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शहरातून डेक्कन जिमखाना ते स. प. महाविद्यालय दरम्यान रविवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. युवक, महिलांचाही मोर्चात लक्षणीय सहभाग होता. नोटाबंदीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हातात फलक धरले होते. घोषणा देत मोर्चा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पोचला. त्या वेळी झालेल्या सभेत खासदार अनिल शिरोळे, प्रशांत बंब, विद्याधर अनास्कर, डॉ. परवेझ ग्रॅंट आदींनी मार्गदर्शन केले. खासदार संजय काकडे यांनी मोर्चाचे संयोजन केले. उषा काकडेही या प्रसंगी उपस्थित होत्या.

Web Title: note ban in support of the march