कायदे करून काही होत नाही, मानसिकता बदला : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

भाषणात पुण्याचा गौरव 
नायडू यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून करताना पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर या समाजसुधारकांचा आणि स्वातंत्र्यसंग्रामींचा वारसा या शहराला लाभला आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंधही पुण्यात निर्माण झाले, असे नायडून यांनी सांगितले. 

पुणे : ''आपली संस्कृती महिलांचा सन्मान करणारी आहे. पण देशाच्या काही भागात काही अनुचित घटना घडल्या आहेत. निर्भया प्रकरणानंतर कायदे बदलण्यात आले पण, त्यानंतर काय झाले? नवीन कायदे करण्याच्या विरोधात मी नाही, पण नुसते कायदे करून काही उपयोग होत नाही. सामाजिक अपप्रवृत्तींना मारण्यासाठी मानसिकताच बदलणे गरजेचे आहे,'' अशा शब्दांत उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देशातील सद्यस्थितीवर थेट भाष्य केले. 

Image may contain: 5 people, people standing, suit and indoor

पंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 16वा पदवी प्रदान समारंभ उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला. यामध्ये 9 सुवर्ण पदके, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यासह 6 हजार 216 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी,मंत्री छगन भुजबळ,विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल यावेळी उपस्थित होते. गीतकार जावेद अख्तर व डीआरडीओच्या शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना नायडू यांच्या हस्ते डिलीट देऊन गौरविण्यात आले. 

Image may contain: 8 people, people smiling, people standing

नायडू म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात, लिंग, भाषा,देश यांची कोणतीही बंधने नसतात. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. पण मेकॉले शिक्षण पद्धतीने खरा इतिहास आपल्याला सांगितला गेला नाही. स्वातंत्र्यसंग्राम, समाज सुधारणांची चळवळसह आपली सांस्कृती व इतिहास हा शिक्षणाचा भाग असेल तरच ते विचार ती पुढच्या पिढीला समजतील. यासाठी शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याचे काम सरकार होती घेतले आहे. 

पाच वर्षांनंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातल्या महिलेची करुण कहाणी   

Image may contain: 6 people, people smiling, people standing and suit

शिक्षण हे स्वाभिमान आणि स्वयंरोजगारासाठी महत्वाचे आहे, कुठेतरी नोकरी करणे हा पर्याय सर्वात शेवटी ठेवा. तुम्ही केवळ पदवी घेतली नसून, सामाजीक मूल्यही अंगीकृत केले आहेत. आई-वडील, गुरू, मातृभाषा, निसर्गाचा सन्मान करा, असे नायडू यांनी सांगितले. 

पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...​

Image may contain: 5 people, people smiling, people standing

भाषणात पुण्याचा गौरव 
नायडू यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून करताना पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर या समाजसुधारकांचा आणि स्वातंत्र्यसंग्रामींचा वारसा या शहराला लाभला आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंधही पुण्यात निर्माण झाले, असे नायडून यांनी सांगितले. 

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल

Image may contain: 6 people, people smiling, people standing and suit

"जगातील पहिल्या 300 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव नसल्याचे वाईट वाटते. शिक्षण क्षेत्रात मोठ्या संशोधन सुरू आहे, यातून विद्यार्थ्यांना सहज व परवडणारे शिक्षण मिळाले पाहिजे. भविष्यात पहिल्या 50 मध्ये आपली विद्यापीठे येतील यासाठी प्रयत्न करावेत.'' 
- वैंकय्या नायडू, उपराष्ट्रपती 

Image may contain: 2 people, people standing

नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बहिण सायमा यांचे पुण्यात निधन

Image may contain: 10 people, people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nothing happens by law, change mindset said Vice President Venkaiah Naidu in pune