नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरला नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगणे कमला नेहरू रुग्णालयातील एका डॉक्‍टराच्या अंगाशी आले आहे. आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांनी संबंधित डॉक्‍टरला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले. 

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाला टिळक यांनी काल अचानक भेट दिली. या वेळी एका गरोदर महिलेला भूलतज्ज्ञ नसल्यामुळे ससून रुग्णालयात जा, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले होते. या महिलेची आज प्रसूती झाली. सीजरिंग करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापौरांनी बैठक घेत खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्या वेळी डॉ. साबणे यांनी ही माहिती दिली. 

महापौर म्हणाल्या, ""रुग्णालयाची स्वच्छता, डॉक्‍टरांची संख्या; तसेच दररोज येणाऱ्या रुग्णांचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्या डॉक्‍टरांनी काल हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना आरोग्य प्रमुखांना दिल्या आहेत.''

Web Title: Notice to doctor at Nehru Hospital