घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - भवानी पेठ, कासेवाडी, टिंबर मार्केट परिसरात घरफोडी आणि जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी आणि 23 मोबाईल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय 22, रा. गुरुद्वारा शेजारी, कॅम्प), विनायक बंडू कऱ्हाळे (वय 20, रा. कासेवाडी, भवानी पेठ) आणि आकाश ऊर्फ चांग्या अनिल पवार (वय 19, रा. कासेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या आरोपींना पाच जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी पाटोळे याची आई आशा पाटोळे ही चोरीच्या मालाची विल्हेवाट लावत असे. 

कासेवाडी येथील महेंद्र मुदलियार यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. सर्व जण झोपी गेल्यानंतर पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, मोबाईल, घड्याळ असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, भरत चापाईतकर, महेंद्र पवार, अजय थोरात, एकनाथ कंधारे, विशाल शिंदे, इम्रान नदाफ, सरफराज शेख आदींनी ही कारवाई केली.

Web Title: The notorious criminal crime burglary bound