सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार जी. के. ऐनापुरेंची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

पुणे  : सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हे समेलंन आयोजित केले आहे.  20 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हे संमेलन होणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जी. के. ऐनापुरे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019 ला दुपारी 12.30 वाजता पत्रकारभवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे हा सत्कार समारंभ होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the novelist G.K. Ainapure selected as President of the Samyak Sahitya Sammelan