नागरिकांनो, घाबरू नका! एका दिवसात घरपोच मिळणार गॅस

Now citizen will get gas at home in one day said Indian Oil Executive Director Amitabh Akhouri
Now citizen will get gas at home in one day said Indian Oil Executive Director Amitabh Akhouri

पुणे : लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर लोकांनी घाबरून गॅस नोंदणी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता ही असुविधा दूर करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी वितरणातील त्रुटी सुधारल्या आहेत. गॅस नोंदणीनंतर एका दिवसात घरपोच सिलेंडर मिळेल, नागरिकांनी बाहेर जाण्याची गरज नाही, असो इंडियन आॅईलचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी स्पष्ट केले. 

Corona Virus : कोरोना विरुद्धच्या लढाईत नौदल 'असे' बजावतोय महत्वाची भूमिका

सध्याच्या एलपीजी गॅस व पेट्रोल डिझेल वितरण व्यवस्थेबद्दल अखौरी यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. अखौरी म्हणाले, "लाॅकडाऊन नंतर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल या भितीने नागरिकांनी गॅस नोंदणीसाठी गर्दी केली. राज्यात इतर वेळी रोज सुमारे ५८ लाख सिलेंडरसाठी नोंदणी होते, पण लाॅकडाऊन नंतर ती ६० लाखापर्यंत गेली होती. सुरक्षेच्या कारणास्तव डिलिव्हरी बाॅय कामावर येत नव्हते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. लोकांनी गॅस नोंदणी साठी गर्दी करू नये म्हणून आता एक गॅस  घेतल्या नंतर त्यासाठी पुढची नोंदणी १५ दिवसांनी करता येणार आहे. एक गॅस सिलेंडर सरासरी २१ दिवस पुरतो, त्यामुळे नोंदणीसाठी १५ दिवसांची मर्यादा टाकली आहे. या नियमामुळे नोंदणी कमी होऊन मागणीवर नियंत्रण आणले आहे. राज्यात भरपूर एलपीजी गॅसचा साठा आहे, त्यामुळे टंचाई निर्माण होणार नसल्याने नागरिकांनी घाबरू नये. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'लाॅकडाऊन'मध्ये एपीजी गॅस वितरक, डिलीव्हरी बाॅय यासह रिफायनरी, एलपीजी प्लांट, स्टोरेज येथे मोठी यंत्रणा काम करत आहे. 'कोरोना'मुळे घाबरलेल्या कर्मचार्यांना सुरक्षीत वाटावे यासाठी त्यांना ग्लोज, सॅनिटाइजर, मास्क अशा सर्व सुविधा पेट्रोलियम कंपन्यांनी पुरविल्या आहेत. त्यामुळे डिलीव्हरी बाॅय कामावर आलेले आहेत. कर्मचार्यांचा १ लाखाचा वैद्यकीय उपचारांसाठी व  दुर्दैवाने मृत्यू झाल्यास ५ लाखाची मदत त्यांच्या कुटूंबांना केली जाणार आहे. 

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

उज्वल योजनेत ७ लाख लाभार्थींचे पैसे जमा
'कोरोना' लाॅकडाऊन काळात पंतप्रधान उज्वल गॅस योजनेतील गॅसधारकांना एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे सिलेंडर मोफत मिळणार आहे. महाराष्ट्रात इंडेन , भारत गॅस, एचपी गॅस यांचे एकुण ४४ लाख योजनेेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी ११ लाख हे इंडेनचे असून, त्यापैकी ७ लाख जणांच्या खात्यात एका महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. येत्या तीन चार दिवसात इतरांचेही पैसे जमा होतील. पुढील सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर पुढेच्या महिन्याचे पैसे जमा होतील, असे अखौरी यांनी सांगितले. 

बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​

गॅस मिळत नसेल तक्रार करा 
पेट्रोलियम कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल आॅफिस नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक वितरकाकडे च्या अधिकार्याचे नाव व नंबर आहे. त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. असे अखौरी यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com