आता स्पर्धाही होताहेत डिजिटल; देशभरातून मिळतोय प्रतिसाद

आता स्पर्धाही होताहेत डिजिटल; देशभरातून मिळतोय प्रतिसाद

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा विविध स्पर्धा डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तत्त्वमुद्रा कल्चर्स, (पुणे) यांच्या वतीने नुकतेच 'संस्कृत कथाकथन' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धले विविध देशातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

‘संस्कृत’ ही आपली संस्कृत भाषेचे महत्व अनन्य साधारण आहे. जवळपास 4000 वर्षे या भाषेने ज्ञानाचे जतन केले आहे आणि त्याला प्रवाही ठेवले आहे. परंतु सध्याच्या पिढीला या भाषेचा विसर पडत असल्याचे दिसत आहे. या ज्ञानपरंपरेची काहीही माहिती न घेता याला टाकाऊ ठरवले जाते नाहीतर याविषयी पोकळ बढाया मारल्या जातात. फार कमी लोक असे आहेत जे प्रामाणिकपणे संस्कृतचे डोळस अध्ययन करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात नागरिक स्वतः च्या मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट अशा पर्यायांना निवडतात. दरम्यान या काळात विद्यार्थ्यांवर संस्कृतच्या उच्चारण व पाठंतराचे संस्कार व्हावेत, आणि सर्वाना संस्कृतचा परिचय व्हावा व सर्वांच्या मनात संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली. डॉ. रवींद्र मुळे व सुवर्णा ढिकले यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तत्त्वमुद्रा कल्चर्स या संस्कृतच्या क्षेत्रात अध्ययन-अध्यापनकार्य करणाऱ्या संस्थेतर्फे हा उज्ज्वल ‘वारसा जाणून घेण्याचा आणि भविष्य घडविण्याचा’ प्रयत्न वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे नियमित सुरू असतो. या स्पर्धे मार्फत डिजिटल आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्कृतसारख्या पुरातन मानल्या जाणाऱ्या विषयाकरिता एक नाविन्यपूर्ण पाउल उचलण्यात आलेले आहे, आणि त्यास संपूर्ण भारतभरातूनच नव्हे, तर विदेशातूनही उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये 6 ते 15 वर्षांच्या विध्यार्थ्यांना सहभाग नोंदवला होता. तर स्पर्धेचा निकाल 22 मे ला जाहीर करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या संदीप ढिकले यानी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या स्पर्धेकरिता ‘संस्कृत फॉर यू’ (पुणे), ‘नादब्रह्म फौंडेशन’ (नाशिक) आणि ‘सत्यम योग’ (पुणे) या तीनही संस्थांचे फार मोलाचे सहकार्य लाभले असून चिमुकल्यांच्या तोंडून देवभाषा संस्कृतचा आस्वाद घेण्याची संधी ‘तत्त्वमुद्रा कल्चर्स’ चे फेसबुक पेज - https://www.facebook.com/Tattwamudra या यावर सर्वांसाठी सर्वकाळ उपलब्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com