'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' वाहनांना आता सक्तीची ; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

download-(9).jpg
download-(9).jpg

पुणे : 1 एप्रिलनंतर उत्पादीत होणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसविणे सक्तीचे होणार आहे. राज्य सरकारच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने सोमवारी या बाबतचे आदेश दिल्याचे प्रभारी आरटीओ संजय राऊत यांनी 'सकाळ' शी बोलताना संगितले.

दुसऱ्या टप्प्यात जुन्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांनाही या नंबर प्लेट बसविणे सक्तीचे होणार आहे. वाहनचोरीला प्रतिबंध करण्यासाठी आणि देशभरातील वाहनांना एका सिरीजचे क्रमांक उपलब्ध व्हावेत, असा त्या मागे उद्देश असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने गेल्या वर्षी 6 डिसेंबरला दिले होते. त्या नुसार प्रक्रिया सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com