आता हाऊसवाईफ बनतायेत युट्युबर; व्हिडिओ कन्टेंटला पसंती

now housewives are becoming YouTubers
now housewives are becoming YouTubers

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडिया हे नागरिकांच्या मनोरंजनाचा मोठा पर्याय झाला होता. लॉकडाऊन आणि सोशल मिडियाला ही एक संधी असल्याचे महिला व गृहिणींनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. चवदार व नवनवीन खाद्यपदार्थच्या रेसिपीज, डान्स आणि इतर कलाकुसर यांचे व्हिडिओ अपलोड करत अनेक महिला युट्यूबर बनल्या आहेत. या अनोख्या स्टार्टअपपासून त्यांच्या उत्पन्नास देखील चालना मिळते आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आता 'न्यू नॉर्मल'शी सुसंगत घालत तसेच आपल्यातील कलेचा प्रचार प्रसार इतरांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग म्हणून महिलांनी व गृहिणींनी या माध्यमाकडे धाव घेतली आहे. तसेच यातून त्यांना उत्पन्नही मिळत असल्याने युट्युबला त्यांची पसंती मिळत आहे.

याबाबत नुकतेच युट्युबवर चॅनेल सुरू केलेल्या अपर्णा चव्हाण म्हणाल्या, "लॉकडाऊनमुळे माझी नोकरी गेली. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविण्याची आवड असल्याने या पदार्थांचे व्हिडिओ अपलोड करून स्वतः चा युट्यूब चॅनेल सुरू करण्याचे ठरविले. घरी बनविण्यात आलेल्या सर्व वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ युट्युबवर टाकण्यास सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या चॅनेलला तसेच व्हिडिओला लोकांची पसंती मिळत गेली. परंतु चॅनेल सुरू करण्यापूर्वी युट्यूबचे सर्व नियम व अटी समजून घेतल्या, तसेच कश्या प्रकारच्या व्हिडिओला पसंती मिळत आहे त्याची पाहणी केली. युट्यूब जरी पैसे कमविण्याचा स्रोत असला तरी सुद्धा यामध्ये नवनवीन कल्पनांची गरज असते. त्यामुळे चॅनेलवरील व्हिडिओचे 'वॉच टाईम' पण वाढतो आणि चॅनेलला एड्सही मिळण्यास सुरुवात होते. तसेच पहिल्यांदा युट्यूब चॅनेल बनविणाऱ्या गृहिणींनी केवळ एक किंवा दोन व्हिडिओ टाकून कंटाळा केला तर चॅनेलची प्रगती होत नाही. त्यामुळे सुरुवातीला सतत प्रयत्न सुरू ठेऊन व्हिडिओ टाकत रहायला पाहिजे. तसेच व्हिडिओसाठीचे 'थंबनेल' (सुरवातीचे दिसणारे चित्र) सुद्धा आकर्षक, वेगळं आणि स्पष्ट असल्यास लोकांचे लक्ष्य अश्या व्हिडिओकडे जाते. गृहिणींसाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून युट्यूब हा चांगला पर्याय आहे. त्यातून त्यांची कला सगळीकडे पोहोचते. तसेच यासाठी महिलांना रोजच्या मोकळ्या वेळेचा वापर करता येतो."


"डायट सल्ला देणे तसेच योगा क्लासेस घेणे हे लॉकडाऊनपूर्वी क्लिनिकमध्ये बसून प्रत्येक्षात लोकांशी भेटून सुरू होतं. परंतु सध्या कोरोनाच्या भीतीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे युट्यूबच्या मदतीने योगाचे क्लासेस घेत आहे आणि आरोग्यासाठी चांगल्या आहाराबाबतची माहिती देत आहे. यामुळे भारताबाहेरून सुद्धा नागरिक संपर्क साधत आहेत. या ऑनलाईन माध्यमातून आता पुन्हा उत्पन्न सुरू झाले आहे."
- डॉ. मानसी जामदर

"लॉकडाऊनमुळे सर्व डान्स क्लासेस बंद ठेवली आहेत. तर यात अडथळा येऊ नये या हेतूने युट्युबवर डान्स व्हिडिओ टाकते. त्यामुळे मुलांना हव्या त्या वेळेत ते पाहता येतो आणि त्या प्रमाणे प्रॅक्टिस सुरू ठेवता येते."
- प्रिया चुटके, नृत्य प्रशिक्षक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com