आरक्षणासाठी आता मातंग समाजाचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

विविध मागण्यांसाठी निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्यास समाजाच्या वतीने राज्यभर लढा उभारण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी मंत्री व आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, अनिल हतागळे, रमेश सकट, सुरेश अवचिते, अरुण गायकवाड, राजू गायकवाड, सुनील बावकर, अविनाश बागवे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण ,लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज माफ करावे, महामंडळाची तत्काळ पुनर्रचना करून ते चालू करावे, बार्ट्टीच्या धर्तीवर आर्ट्टीची स्थापना करावी, संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे काम लवकर सुरू करावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, चिरानगर येथील अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे, संजय ताकतोडे यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, आदी समाजाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the movement of the Matang community for reservation