विद्यार्थ्यांनो, घरबसल्या करा अभ्यास! आता बारावीची पुस्तके मिळणार पीडीएफ स्वरुपात

Now students will get the books of XII through PDF by balbharti.jpg
Now students will get the books of XII through PDF by balbharti.jpg

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला खरा; पण त्याची पुस्तके मिळणार कधी हा प्रश्न शाळांना पडला आहे. त्यामुळे ही पुस्तक पीडीएफद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शालेय शिक्षण विभाग दरवर्षी टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमांमध्ये बदल करत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता. नव्या धोरणानुसार परीक्षा या प्रश्नपत्रिका नव्हे; तर कृती पत्रिकांच्या आधारे घेतल्या जाव्यात, असा उद्देश समोर ठेवून अभ्यासक्रमाची फेररचना करण्यात येत आहे. दहावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप देखील बदलण्यात आले. त्यानंतर अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल झाला होता.


यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याची पुस्तके देखील बालभारतीने छापलेली आहेत. परंतु सध्या 'लॉकडाऊन' असल्याने ही पुस्तके बाजारात आणायची कशी, असा प्रश्न सरकारी यंत्रणेने पुढे आहे. त्यात दुकाने बंद असल्याने पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार कशी, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात शिकवायचे कसे, अशी विचारणा शाळांकडून केली जाऊ लागली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सक्तीने घरात बसून आहेत. अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन धडे देण्याचे नियोजन शाळांनी केले होते. मात्र, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकत नसल्याची खंत या शाळांनी व्यक्त केली आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देता येत नसतील, तर त्याच्या पीडीएफ तरी बालभारतीने त्यांच्या संकेतस्थळावर द्याव्यात, अशी मागणीही शाळांकडून होऊ लागली आहे

Corona Virus : देशात प्रथमच पोलिसांसाठी संजीवनी मोबाईल वाहनाचा प्रयोग'

बालभारती'चे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "बारावीची सर्व विषयाची पुस्तके छापून झालेली आहेत. परंतु 'लॉकडाऊन'मुळे ही पुस्तके शाळा वा दुकानांमध्ये पाठविता येत नाहीत. ही पुस्तके शाळांपर्यंत कशी पोचवायची याबद्दल विचार सुरू आहे. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल."

''शिक्षण आयुक्त आणि संचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. त्यात बारावीच्या बदललेल्या पुस्तकांचे पीडीएफ संकेतस्थळावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. लवकरच त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे.''
- वर्षा गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com