अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार

PNE19P04553.jpg
PNE19P04553.jpg

पुणे : "अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार', अशा घोषणा देत शिक्षणाचे खासगीकरण, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे, सन्मानपूर्वक न मिळणारा रोजगार आदी सरकारच्या तरुणांविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी यंग इंडिया अधिकार मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.


फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कॅफे गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनात विविध संघटनांचे तरुण सहभागी झाले होते. या अधिकार मोर्चाच्या माध्यमातून देशभरातील 50 हजार तरुणांना एकत्र करून 7 फेब्रुवारीला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. या वेळी गाणी, भाषणे, "जुमला नहीं रोजगार मॉंग रहा है यंग इंडिया' अशा घोषणांचे फलक दाखवून सरकारी धोरणांचा विरोध करण्यात आला. 

मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी वर्षाला दोन कोटी रोजगार, पंधरा लाख रुपये आदी घोषणा देऊन तरुणांची दिशाभूल केली होती; पण शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, शुल्क वाढ, कामाची असुरक्षितता आदी कारणांमुळे आजचा तरुण अस्वस्थ झाला असल्याचे या वेळी भाषणांमधून सांगण्यात आले. 

''महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणावर मिळणाऱ्या शिष्यवृत्ती सरकारकडून बंद करण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच क्षेत्रांतील कंत्राटीकरणांमुळे रोजगाराची हमी, सुरक्षा काहीच राहिलेली नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन देणारे सरकार आहे तोही रोजगार कमी करीत आहे. या विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत.''
- जितेंद्र शारदा अरुण, यंग इंडिया अधिकार आंदोलनाचा सदस्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com