NSUI: काँग्रेसने विद्यार्थी संघटनेमधील वाद अखेर मिटवला, पुण्याच्या शहर अध्यक्षपदी NSUI Congress finally settles student union Gore Pune city president | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी गोरे

NSUI: काँग्रेसने विद्यार्थी संघटनेमधील वाद अखेर मिटवला, पुण्याच्या शहर अध्यक्षपदी गोरे

पुणे - नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिजित चंद्रकांत गोरे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करीआप्पा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी संघटनेत पुणे शहर जिल्हा अध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला होता मात्र आता करीआप्पा यांनी अभिजित गोरे हेच अध्यक्ष असल्याचे पत्र दिले आहे.त्यांनी काँग्रेसमधील विद्यार्थी संघटनेमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

नॅशनल स्टुडन्ट ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून गटबाजी सुरु असतानाच या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आणि राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी नागेश करीआप्पा यांनी हस्तक्षेप करत अभिजित गोरे हेच पुणे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत असे पत्रक प्रसिद्धीस देऊन काँग्रेस पक्षातील वादावर पडदा टाकत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान गोरे यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र देऊन शुभेच्छा दिल्या,गोरे यांनी माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम,आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री रमेश बागवे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी नगरसेवक रामचंद्र चंदूशेठ कदम,युवक काँग्रेस चे प्रदेश महासचिव विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात व शहरात विद्यार्थी वर्गात काँग्रेस विचार वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले..