पुण्यातून विमान प्रवासी संख्येत झाली 'एवढ्या' टक्‍क्‍यांनी वाढ!

The number of air passengers from Pune increased by 36 percent
The number of air passengers from Pune increased by 36 percent

पुणे : परराज्यांतून ये-जा करण्यासाठी विमान प्रवासाचा वापर वाढल्यामुळे शहरातून होणाऱ्या देशातंर्गत प्रवासी संख्येत सुमारे 36 टक्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील प्रवासी संख्येवरून लोहगाव विमानतळ प्रशासनाने हा निष्कर्ष काढला आहे. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातंर्गत विमान वाहतुकीला केंद्र सरकारने 25 जून रोजी परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या महिन्यात विमानांची 204 उड्डाणे झाली आणि त्यातून 17 हजार 295 प्रवाशांची वाहतूक झाली. जून महिन्यांत प्रवासी संख्येने 1 लाख 17 हजारांचा टप्पा ओलांडला तर, उड्डाणांचीही संख्या वाढून 1391 झाली. जुलैमध्ये उड्डाणांची संख्या 1440 तर, ऑगस्टमध्ये 1684 झाली. प्रवासी संख्येतही अनुक्रमे 1 लाख 9 हजार 978 आणि 1 लाख 49 हजार 588 ने वाढ झाली. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत प्रवासी संख्या वाढत असल्याचे लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांचे निरीक्षण आहे. कोरोनाचे संकट असताना, प्रवासी संख्या वाढत आहे. मात्र, त्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासन पूर्ण उपाययोजना करीत आहेत. तसेच प्रवाशांना 14 दिवसांचे होम क्वारंटाईन होण्यास सांगितले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

या बाबत हवाई वाहतूक विश्‍लेषक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, ""विमान वाहतूक क्षेत्रासाठी पुणे शहर महत्त्वाचे आहे. उद्योग, शिक्षण आणि सेवा क्षेत्र येथे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत विमान वाहतूक मंदावली आहे. त्यात वाढ व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्याच उपाययोजनांमुळे किमान वाहतूक तर सुरू झाली आहे. केंद्र सरकार प्रवाशांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करू शकले तर, ही संख्या अजून वाढू शकते.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सल्लागार दीपक शिकापूर म्हणाले, ""औषध निर्माण आणि त्याच्याशी संबंधित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास सध्या वाढला आहे. तसेच काही प्रमाणात सेवा क्षेत्रातील लोकही वाहतूक करू लागले आहेत. परंतु, ही वाहतूक सरसकट नाही तर, अत्यावश्‍यक कामांसाठीच होत आहे. कारण काही प्रमाणात प्रवाशांच्या मनात अजूनही धास्ती आहेच.'' 

अंगावर धावणारी मोकाट कुत्री अन् तळीरामांचा त्रास; सांगा उद्यानात यायचे कसे?

लोहगाव विमानतळावरून अशी असेला आता बससेवा 
1 - नगर रस्ता, चंदननगर, मगरपट्टा, हडपसर 
2- कल्याणीनगर, वाडिया कॉलेज, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट 
3- पुणे स्टेशन, महापालिका, डेक्कन, कोथरूड 
4- पुणे स्टेशन, पुणे विद्यापीठ, वाकड, हिंजवडी 
5- विश्रांतवाडी, भोसरी, पिंपरी, निगडी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com