esakal | बारामतीकरांनो, असाच संयम राखा...81 जणांचा कोरोना रिपोर्ट आलाय असा...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या हळुहळू कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. काल केलेल्या 81 तपासण्यांमध्ये बारामतीतील दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित सर्व 79 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बारामतीकरांनो, असाच संयम राखा...81 जणांचा कोरोना रिपोर्ट आलाय असा...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या हळुहळू कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. काल केलेल्या 81 तपासण्यांमध्ये बारामतीतील दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित सर्व 79 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लोकांनी स्वतःची काळजी घेण्यास प्रारंभ केलेला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या हळुहळू कमी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. 

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 124 वर जाऊन पोहोचली असून, 51 रुग्ण उपचार घेत आहेत, 62 जण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 11 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. मोठ्या संख्येने लोक आता निगेटीव्ह येऊ लागल्याने प्रशासनाचीही चिंता काहीशी कमी झाली आहे. बारामती शहरातील दैनंदिन व्यवहार सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंतच सुरु असतात. त्यामुळे दुपारी तीननंतर शहरात शुकशुकाट जाणवतो. लोक आपली खरेदी दुपारी तीनच्या आतच उरकून घेतात. 

मंदिर बंद असले तरी या ग्रामस्थांनी अशी सांभाळली परंपरा... 

बारामतीत कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार व्हावेत, या साठी उपविभागीय अधिका-यांनी कोरोना वॉर रुम तसेच व्यवस्थापन समितीचीही स्थापना केलेली आहे. विविध विभागात समन्वय असावा, या उद्देशाने ही रचना करण्यात आली आहे. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व पुरेसे बेड उपलब्ध व्हावेत, या साठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. लोकांनी स्वतःची काळजी घेण्यास प्रारंभ केलेला आहे. तसेच, अनावश्यक घराबाहेर पडायचे लोकच टाळत असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या हळुहळू कमी होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.