पुणे जिल्ह्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढली!

coronavirus
coronavirus

पुणे : पुणे जिल्ह्यात काल पहिल्यांदाच नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात काल (ता. २७) दिवसभरात एकूण ३ हजार ३१३ नवे  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट तब्बल ३ हजार ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे काल नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५८१ ने अधिक आहे.

यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख २८ हजार ४७६ झाली आहे. कालच्या एकूण नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५४८ जण आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६६०, नगरपालिका क्षेत्रात २०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८५ नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आज ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पिंपरी-चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८ आणि  नगरपालिका क्षेत्रातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com