tt.jpg
tt.jpg

पुर्व हवेलीच्या भागात एकाच दिवसात तब्बल 'एवढे' रुग्ण

लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीत मागील तीन दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. रविवारी (ता. ९) एकाच दिवसात उरुळी कांचन (१४), लोणी काळभोर (८) व कदमवाकवस्ती (७) या तीन ग्रामपंचायत हद्दीत तब्बल २९ रुग्ण आढळून आले आहेत. 

उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीमधील कांही प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. ७) दिवसभरात सत्तावन्न रुग्ण तर शनिवारी (ता. ८) दिवसभऱात २४ आढळून आले होते. यात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या २९ रुग्णांची भर पडली आहे. पुर्व हवेलीत मागील तीन दिवसापासून कोरोनाचा विस्फोट होत असताना, नागरीक मात्र आपल्याला कोरोना होऊच शकत नाही या अर्विभावात विनामास्क व सोशल डिस्टस्निंगचा फज्जा उडवत फिरत असल्याचे चित्र आहे. 

पुर्व हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत मागील विस दिवसापासून कोरोनाने मोठ्या प्रमानात थैमान घातले होते. केवळ दहा दिवसाच्या कालावधीत वरील प्रमुख सात ग्रामपंचायत हद्दीत दिडशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोना वाढीची परीस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असतानाच, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करुन रुग्ण संख्या आटोक्यात आनली होता. त्यानंतर मागिल दहा दिवसात रुग्ण वाढीचा वेग मंदावला असतानाच, मागिल तीन दिवसापासुन कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

दरम्यान रविवारी सकाळी आलेल्या स्वॅच्या तपासनी अहवालानुसार, उरुळी कांचन हद्दीतील पीएमटी बसथांबा परीसरात तीन रुग्ण तर बायफ रस्त्यावर तीन रुग्ण आढळुन आले आहेत. तर सिंडीकेट बॅक परीसरात चार रुग्ण आढळुन आले आहेत. आश्रम रस्त्यावर दोन तर बसथांब्याजवळील पाण्याच्या टाकीच्या आसपास दोन असे एकुन १४ कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत माळीमळा (३), सिद्राममळा (२), बेट वस्ती (१) पाषानकर बाग (१), व राममंदीर परीसर (१) असे ८ रुग्ण आढळुन आले आहेत. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कदमवस्ती (५), घोरपडे वस्ती (१), अबिंकामाता मंदीर परीसर (१) असे सात रुग्ण आढळुन आले आहेत.

बारा दिवसात १४ जनांचा मृत्यू-
मागील बारा दिवसापासून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. मागिल बारा दिवसात उरुळी कांचन (२), थेऊर (३), आळंदी म्हातोबाची (१), नायगाव (१), कुंजीरवाडी (१), लोणी काळभोर (३), कदमवाकवस्ती (३) असे चौदा रुग्ण मृत्युमखी पडले आहेत. यामुळे पुर्व हवेली पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनतो की काय अशी शंका येऊ लागली आहे. 

"लवकर निदान तर लवकर उपचार" 
दरम्यान पुर्व हवेलीमधील रुग्ण वाढीबद्दल बोलतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, ''पुर्व हवेलीत मागिल तीन दिवसापासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे ही बाब खरी आहे. मागिल चार दिवसापासुन स्वॅबच्या टेस्टींग वाढवल्याने, रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे. कोरोना झाल्याचे लवकर निस्पन्न झाल्यास, रुग्णावर उपचार करणे सोपे जात असल्याने, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने "लवकर निदान तर लवकर उपचार" ही योजना सुरु केली आहे. पन्नास टक्क्याहुन अधिक रुग्णात कोरोनाची लक्षणे जाणवत नसली तरी, त्यांची टेस्ट मात्र पॉझिटीव्ह येते असते. असे रुग्ण स्वतःही पॉझिटीव्ह असतात व दुसऱ्याला संक्रमण पोचवतात. हे थांबवण्यासाठी स्वॅबच्या टेस्टींग वाढवले आहे. यामुळे पुढील कांही दिवसात रुग्ण वाढीचा वेग कमी होईल अशी आरोग्य विभागाला अपेक्षा आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com