बाप रे, बारामतीकरांनो कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या!

मिलिंद संगई
Sunday, 30 August 2020

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत चालल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.

बारामती : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत चालल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागली असून, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी आता अधिकाधिक बेडची गरज भासू लागली आहे. बारामतीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने पावणेआठशेच्या घरात जाऊन पोहोचला असून, हा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनापुढे आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

बरे होणा-या रुग्णांच्या टक्केवारीचे प्रमाण वाढविणे व मृत्यूची टक्केवारी शून्यापर्यंत खाली आणण्याची दोन मोठी आव्हाने प्रशासनासमोर आहेत. काल 68 आणि आज 28 असे दोन दिवसात मिळून तब्बल 96 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक जण पॉझिटीव्ह येण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान दोन कोरोनाग्रस्तांचा काल दिवसभरात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 33 वर गेली आहे.  Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

काल बारामती मध्ये एकूण 186 जणांचे नमुने आरटीपीसीआर  तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 137 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अठरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तसेच बारामती शहरातील सतरा व ग्रामीण भागातील 11 अशा 28 जणांचा अहवाल आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आहे. बारामतीतील रुग्णसंख्या 776 पर्यंत गेली आहे. काल रात्री बारामतीतील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असलेल्या दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, कोरोनातून बरे होणा-यांची टक्केवारी 58 टक्क्यांपर्यंत गेली आहे. हीच आकडेवारी 70 टक्क्यांहून अधिक होईल, तेव्हाच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असा निष्कर्षण काढता येईल. – डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 
सिल्व्हर ज्युबिलीमध्ये टेस्टची सोय होणार.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात बारामती शहरातील रुग्णांच्या आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब संकलन सुविधा येत्या दोन दिवसात सुरु होईल. रुई येथे फक्त रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतल्या जातील व ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरटीपीसीआर स्वॅबचे संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होईल. ही रचना येत्या दोन तीन दिवसात कार्यान्वित होईल- डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, बारामती.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients is increasing in Baramati