सोनोरी गावातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

सोनारी (ता. पुरंदर ) येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाव १० दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. गावची पॉझिटिव्ह संख्या पहिली १० होती. पण आज त्यात ४ रुग्णांचा भर पडली असून ती संख्या १४ वर गेली असल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.

गराडे (पुणे) : सोनारी (ता. पुरंदर ) येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाव १० दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. गावची पॉझिटिव्ह संख्या पहिली १० होती. पण आज त्यात ४ रुग्णांचा भर पडली असून ती संख्या १४ वर गेली असल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.

  तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 
 
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावाकडे येणारी वाहतूक थांबवावी. यासाठी दिवे-सोनोरी तसेच वनपुरी-सोनारी हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर सासवड-सोनोरी या रस्त्यावर चेक पोस्ट ठेवण्यात येऊन या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या यांच्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे अशी माहिती माजी सरपंच सतीश शिंदे यांनी दिली.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

गावात दोन दिवसाआड औषध फवारणी केली जात असून आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप गावात केले आहे. जे संशयित रुग्ण आहेत त्यांना सी व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तसेच माक न वापरता गावात फिरणार्‍या लोकांवर ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तर जे लोक क्वारंटाइन आहेत त्यांनी घराबाहेर कोणत्याही परिस्थितीत पडायचे नाही असा ठराव सरपंच कविता काळे, उपसरपंच नितीन काळे व सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला आहे. लोकांनी घरातच राहून सुरक्षित रहावे व शासनाला सहकार्य करावे असे आव्हान ग्रामसेविका ज्योती काळभोर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of Corona victims in Sonori village has increased