esakal | राज्यात पंधरा महिन्यांत कोरोनाबाधीतांची संख्या 65 लाखांवर
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यात पंधरा महिन्यांत कोरोनाबाधीतांची संख्या 65 लाखांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या 15 महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सोमवारी 65 लाखांवर गेली. त्यापैकी 63 लाट 9 हजार रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे झाले. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.

हेही वाचा: हौशी पुणेकराची कमाल, घरातच साकारला मेट्रो प्रकल्पाचा देखावा !

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्च 2020 रोजी आढळला. त्यानंतर पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर अशा शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. गेल्या पंधरा महिन्यांमध्ये कोरोनाबाधीतांची संख्येने 65 लाखांचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा: चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्याला करुन दिली मोकळी वाट !

लवकर निदान आणि प्रभावी उपचार ही कोरोनाच्या उपचाराचे सूत्र आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतर तातडीने वैद्यकीय चाचणी करावी. ती पॉझिटीव्ह आल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावे. या कोरोनाच्या उपचार सूत्राचे तंतोतंत पालन राज्यात झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही 97 टक्के रुग्ण बरे झाले, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

  • राज्यातील मृत्यूदर : 2.12 टक्के

  • आतापर्यंत तपासलेले नमूने : 5 कोटी 60 लाख 88 हजार 114

  • पॉझिटीव्ह आलेले नमूने : 65 लाख 617

  • संसर्गाचा दर : 11.59 टक्के

  • अँक्टिव्ह रुग्ण : 49 हजार 880

loading image
go to top