पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या सहाने वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

महापालिका निवडणुकांसाठी चारसदस्यीय प्रभागपद्धती रद्द करून त्याऐवजी एकसदस्यीय वॉर्ड करण्यात येणार आहे. या नव्या बदलानुसार पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या १७० पर्यंत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तितक्‍याच नव्या वॉर्डची रचना होऊ शकते. 

पुणे - महापालिका निवडणुकांसाठी चारसदस्यीय प्रभागपद्धती रद्द करून त्याऐवजी एकसदस्यीय वॉर्ड करण्यात येणार आहे. या नव्या बदलानुसार पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या १७० पर्यंत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तितक्‍याच नव्या वॉर्डची रचना होऊ शकते. 

नव्या रचनेमुळे आगामी महापालिका निवडणुकांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पारडे जड होईल, अशी आशा महाविकास आघाडीला आहे. महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विधानसभेच्या २०१४ निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युतीने महापालिकेच्या निवडणुका चारसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. बहुसदस्यीय प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर पडल्याने बहुतांश महापालिकांत या पक्षाची सत्ता आली. मात्र, सत्तांतर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपची राजकीय कोंडी करण्याची नीती आखली आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यानुसार पुण्यासह सर्वच महापालिकांच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्याची प्रभागरचना ही २०११ च्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. त्यात किमान १७ ते २० हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक, असे प्रमाण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corporators in Pune Municipal Corporation will increase