Video : दौड जंक्शनवर प्रवाशांची संख्या दुप्पट

सम्राट कदम
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुणे : मध्य रेल्वेचा पुणे मुंबई मेगाब्लॉक आणि कोल्हापूर, सातारा येथील पुराचा ताण दौड जंक्शनला बसला आहे. येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसाला १० हजारावरून २० हजार झाली असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

पुणे मार्गे मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या दौड येथे थांबत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज महामंडळाच्या दोन बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दूध, पालेभाज्या यांची आवकही मंदावली असल्याचे अधिकारी म्हणाले. पूर्वी ९० रेल्वे गाड्या येथून जायच्या तर आता तीच संख्या ११० झाली आहे. मेगा ब्लॉक हटल्यानंतर व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of passengers doubles at the daund junction