शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात थुई...थुई मयुर नृत्य; कृषी पर्यटन मात्र धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

  • शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात मयुरांची संख्या वाढली...

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चिंचोली मोराची नंतर इतर गावातही पाणी व अन्न धान्यामुळे मोरांची संख्या वाढलेली पहावयास मिळत आहे. पावसाच्या आगमना नंतरच्या हिरवाईने गावागावात मोरांचे ओरडणे व थुई...थुई करून नाचणे पहावयास मिळू लागल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची हे गाव मोरांच्या अस्थित्वामुळे प्रसिद्धीस आहे. त्यामुळे तेथे अनेक प्रकारचे कृषी पर्यटन केंद्र म्हणून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. देशभरातून येथे सुट्टीच्या काळात पर्यटक मुक्कामी राहून गर्दी करताना दिसतात. पावसामुळे तयार झालेल्या नैसर्गीक वातावरणामुळे येथे मोरांचे नाचणे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. चिंच, बोर, सिताफळ, आंबे या मु्ख्य फळांबरोबर हुर्डा पार्टी देखील केली जाते. त्यामुळे पर्यटक एक दिवसाची सहलीसाठी व शैक्षणीक सहली येथे येतात.
-------------
पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
ग्रामीण भागातील शाकाहार भोजन आणि मिरचीचा खर्डा यामुळे हा परीसर पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान बनला आहे. त्यामुळे या गावाला विशेष कृषी पर्यटनाचे स्थान निर्माण झाले आहे. यामधून तरूणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कृषी पर्यटन केंद्र बंद आहेत. बंदच्या काळात येथील कृषी केंद्रांना येथील मोर वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य आणून टाकावे लागत आहे. कृषी विभाग व वन विभागाने पहाणी करून मोरांच्या अन्न व पाण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. चिंचोली मोराची या गावानंतर कवठे येमाई, मलठण, कान्हूर मेसाई, चांडोह, पिंपरखेड, वडनेर, सविंदणे, लाखेवाडी, टाकळी हाजी, फाकटे, चांडोह, खैरेनगर या परीसरात मोरांची संख्या वाढली आहे. या गावांमध्ये अन्न व पाणी मिळू लागल्याने मोरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले पहावयास मिळते. त्यामुळे पावसाळी वातावरणात गावागावात मोरांचे थुई...थुई करून नाचणे व ओरडणे ऐकू येऊ लागले आहे.

पर्यटन व्यवसाय धोक्यात...
मोरांचे व इतर पशुपक्षांचे अस्थित्व लक्षात घेऊन तरूणांनी कृषी पर्यटनासारखा रोजगार निर्माण करावा. असे आवाहन केल्याने शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथे अनेक कृषी पर्यटन केंद्र झाले. पर्यटनावर बंदी व कोरोनामुळे पर्यटक कृषी पर्यटन केंद्राकडे येत नसल्याने कृषी केंद्र धोक्यात आली आहेत. शेकडो मोरांची जपवणूक करण्यासाठी कृषी पर्यटना मधूनच धान्य दिले जाते. याकडे लक्ष वेधून कृषी विभाग व वनविभागाने धान्याचा पुरवठा करावा. - आनंदराव थोपटे, आनंद कृषी पर्यटन केंद्र चिंचोली मोराची ता. शिरूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of peacocks has increased in the western part of Shirur taluka

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: