पीएमपीची प्रवासी संख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे पीएमपीच्या तिजोरीत सुमारे २५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आता जमा होऊ लागले आहे. प्रवासी संख्याही पावणे दोन लाखांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे रस्त्यावरील बससंख्या वाढविण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासन तयार करीत आहे.

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवासी संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे पीएमपीच्या तिजोरीत सुमारे २५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आता जमा होऊ लागले आहे. प्रवासी संख्याही पावणे दोन लाखांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे रस्त्यावरील बससंख्या वाढविण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासन तयार करीत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे १८ मार्चपासून पीएमपीची शहर आणि पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद होत गेली. दोन्ही शहरांतील अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच २५ मार्चनंतर बससेवा सुरू होती. त्यानंतर लॉकडाउन शिथिल होत गेला. त्यामुळे दोन्ही महापालिकांनी दिलेल्या परवानगीनुसार ३ सप्टेंबरपासून पीएमपीची वाहतूक सुरू झाली आहे. सध्या सुमारे २५ टक्के क्षमतेने बससेवा सुरू आहे. त्यामुळे ४२१ बस रस्त्यावर धावत आहेत. त्या शिवाय अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी २० तर, कोरोना उपचाराच्या मदत कार्यात सुमारे २० बस आहेत. कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, हडपसर, निगडी, भोसरी, पिंपरी आदी मार्गांवर सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात दरम्यान प्रवासी संख्या वाढू लागली आहे. 

धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी

आयुक्तांशी चर्चा करून निर्णय
गेल्या तीन दिवसांत पीएमपीच्या प्रती दिन उत्पन्नाने सुमारे २५ लाखांचा टप्पा गाठला असून प्रवासी संख्याही १ लाख ७५ हजारांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी बससंख्या वाढविणे गरजेचे आहे. या बाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप हे दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of PMP passengers increased