राज्याचे प्रशासनातील वाढते प्रमाण अभिमानास्पद - बडोले

बाबा तारे
शनिवार, 30 जून 2018

औंध (पुणे) : "आपल्या राज्यातून प्रशासनात जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण आता वाढत असून ही अभिमानाची बाब आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश बिहारसह इतर राज्याचे प्रशासनातील प्रमाण जास्त होते परंतु आता आपल्या राज्यातील तरुणही स्पर्धा परिक्षेत पुढे जात आहेत हे अभिमानास्पद आहे.

औंध (पुणे) : "आपल्या राज्यातून प्रशासनात जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण आता वाढत असून ही अभिमानाची बाब आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश बिहारसह इतर राज्याचे प्रशासनातील प्रमाण जास्त होते परंतु आता आपल्या राज्यातील तरुणही स्पर्धा परिक्षेत पुढे जात आहेत हे अभिमानास्पद आहे. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आशादायक असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे व त्याचा लाभ घेत अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहचले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्था(बार्टी) यात महत्वाची भूमिका बजावत आहे" असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काढले.

यशदा येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षा व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी झालेल्या  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे,आयुक्त मिलींद शंभरकर,अनुसुचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य सी.एल.थुल,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे इत्यादी उपस्थित होते.पुढे बोलतांना बडोले म्हणाले "वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थी पुढे यावेत व प्रशासकीय सेवेत जावेत हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही बार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यासाठी दिल्ली येथे दरवर्षी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने पाठवत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे. या योजनांचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व देशसेवेसाठी प्रयत्न करावेत" असेही ते म्हणाले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे म्हणाले,"सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्ली येथे पाठवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.तसेच बार्टी व यशदाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थी यशस्वी होत आहेत हि आनंदाची बाब आहे." यावेळी बोलतांना सी.एल.थुल म्हणाले " वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन प्रशासनात जावे यासाठी बार्टी करत असलेले कार्य हे उल्लेखनिय आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही या संधीचा योग्य लाभ घ्यावा.अपयशातूनच  यशाकडे जाता येते त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत रहावे."यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.

Web Title: number of state in administration is very proud said minister badole