पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाखांवर पोचणार 

पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाखांवर पोचणार 

पुणे - शहरात नुकत्याच राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानातील अर्जांसोबतच सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मतदार नोंदणीबाबत येणाऱ्या अर्जांमुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील गृहनिर्माण संस्थांमधील मतदार अर्जांची संख्या आठ हजारांच्या आसपास असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाखांवर पोचणार आहे. 

जिल्हा निवडणूक शाखेने 31 जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. त्यानुसार मतदारांची संख्या 73 लाख 69 हजार 141 इतकी झाली आहे. त्यानंतर 23, 24 फेब्रुवारी तसेच दोन आणि तीन मार्च रोजी विशेष अभियान राबविले. त्यामध्ये आणखी 42 हजार 804 मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट होतील. जिल्हा निवडणूक शाखेकडून शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट, कसबा पेठ, वडगाव शेरी, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे त्यांच्या संस्थांमधील पात्र सभासदांची नावे यादीत समाविष्ट करण्याबाबत जबाबदारी दिली होती. त्यामुळे मतदारांची संख्या वाढणार असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com