पिंपरीत डुकरांचा सुळसुळाट; पाचशे डुकरे पकडली

पिंपरीत डुकरांचा सुळसुळाट; पाचशे डुकरे पकडली

पिंपरी : शहरातील भटक्‍या, उपद्रवी डुकरांना प्रतिबंध करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये सुमारे पाचशे डुकरांना पकडण्यात आले. संबंधित ठेकेदाराकडूनच त्यांची आता विल्हेवाट लावली जाणार असून, मोहिमेला मुदतवाढ देण्याचेही विचाराधीन आहे. 

शहरातील भटक्‍या, उपद्रवी आणि मोकाट डुकरांना पकडून त्यांना शहराच्या हद्दीबाहेर लावण्यासाठी महापालिकेकडून एका परप्रांतीय ठेकेदाराला काम सोपविण्यात आले होते. त्यानुसार, त्याने जवळपास महिनाभर मोहिम राबविली. 20 ते 25 कामगारांच्या मदतीने त्याने सुमारे पाचशे डुकरे पकडली.

थेरगाव, भोसरी, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपरीगाव, चिंचवड, काळेवाडी, निगडी, यमुनानगर आदी भागांमधून ही डुकरे पकडण्यात आली. संबंधित ठेकेदार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील असून, त्याच्यावरच या डुकरांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे, अतिक्रमण विभाग यांनी ही मोहिम पार पाडली. मोहिमेच्यावेळेस डुकरे पाळणाऱ्या लोकांकडून पथकाला थोडा-फार विरोधही सहन करावा लागला. भोसरी एमआयडीसी येथे मोटारीमधून जात असताना डॉ.दगडे यांच्या गाडीवर एकाने दगड मारल्याचा प्रकारही घडला होता. त्याला पोलीसांनी अटक केली होती. 

शहरात आणखी सुमारे 1 हजार डुकरे असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, परत ही मोहिम राबविण्याचे आमच्या विचाराधीन आहे. संबंधित ठेकेदार हुबळी येथील असून, तेथील पिग फार्ममध्ये त्यांचे संगोपन करणार आहे. 

-  डॉ.अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com