esakal-3.jpg
esakal-3.jpg

अरुण दाते यांच्या आठवणींना मिळाला उजाळा 

पुणे :  ' पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची..., आणि जीवना तू कसा मी असा..., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ...' ही आणि यांसारख्या गीतांनी अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अरुण दाते कला अकादमी आणि रोहन पाटे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ' नवा शुक्रतारा ' या कार्यक्रमाचे.

यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, रोहन पाटे, बुकगंगाचे मंदार व सुप्रिया जोगळेकर, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, गौरी देव आणि हिमांशू कुलकर्णी आदी उपस्थित होते. अरुण दाते यांच्या ' शुक्रतारा' या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि ' हात तुझा हातातून' या पुस्तकाचे प्रकाशन आमदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात गायक मंदार आपटे, गायक राजीव बर्वे, गायिका प्रियांका बर्वे यांनी अरुण दाते यांची गाणी सादर केली. अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी निवेदन केले. याबरोबरच अतुल दाते यांनी अरुण दाते यांच्या आठवणी  सांगितल्या. तर संगीता बर्वे यांनी काव्यवाचन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com