दिवाळीनिमित्त तीन गाड्यांना जादा डबे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - दिवाळीदरम्यान प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन झेलम, आझाद हिंद आणि पाटणा एक्‍स्प्रेस या गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. एक नोव्हेंबरपासून हे वाढीव डबे असतील.

पुणे-जम्मूतावी-पुणे झेलम एक्‍स्प्रेस (११०७७ व ११०७८), पुणे-हावडा-पुणे आझाद हिंद एक्‍स्प्रेस (१२१२९ व १२१३०) व पुणे-पाटणा- पुणे एक्‍स्प्रेस (१२१४९ व १२१५०) या गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत एक नोव्हेंबरपासून वाढ होणार आहे. 

प्रवाशांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे करण्यात आले आहे. पुणे-भुसावळ आणि भुसावळ-पुणे या गाड्या येत्या २६ ऑक्‍टोबरपर्यंत दौंड-मनमाडमार्गे धावणार आहेत. इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या लोहमार्गाच्या कामांमुळे हा बदल झाल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

Web Title: On the occasion of Diwali additional three trains coaches