डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापुजन, बुध्दवंदना व रक्तदान

प्रशांत चवरे
शनिवार, 14 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 127 वी जयंतनी भिगवण व परिसरामध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, ध्वजवंदन, बुध्द वंदना, रक्तदान शिबीर, मनोरंजनपर कार्यक्रम आदी धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील अमरबौध्द युवक संघटनेच्या वतीने बौध्द विहारांमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव व अशोक काटे यांचे हस्ते ध्वजवंदनाने जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सरपंच हेमाताई माडगे व उपसरपंच प्रदीप वाकसे यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, भाजपचे मारुती वणवे, संपत बंडगर, जयदीप जाधव, संतोष सोनवणे, बाळासाहेब शेलार, सुनिल शेलार, उपस्थित होते. यावेळी त्रीशरण व पंचशील यांचे गायन निवासी भंत्तेगण यांनी केले. प्रास्ताविक अमोल कांबळे यांनी सुत्रसंचालन देवानंद शेलार यांनी केले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच्या मिरवणुवकीचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण पत्रकार संघाच्या वतीने रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. 56 रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरांमध्ये सहभाग घेतला. रक्तदान शिबीराचे नियोजन दादा थोरात, अमोल कांबळे, नितीन चितळकर, काशीनाथ सोलनकर यांनी केले. 

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. माजी सरपंच प्रशांत शेलार, शंकरराव गायकवाड यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. अशोक शिंदे, अशोक पाचांगणे, अण्णासाहेब धवडे, संतोष धवडे, रियाज शेख, महेश शेंडगे, संदीप वाकसे, प्रभाकर जाडकर, दत्तात्रय पाचांगणे, वंदना शेलार ग्रामविकास अधिकारी भिमराव भागवत व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन गणेश राक्षे यांनी केले.

येथील अष्टविनायक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सरपंच हेमाताई माडगे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन लालासाहेब धवडे यांनी केले. विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष बापुराव थोरात व सचिव विजयराव थोरात यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये  प्राचार्य तुषार क्षीरसागर यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. येथील कला महाविदयालयांमध्ये प्रा. शाम सातर्ले, भगवान लोंढे, गणेश जाधव यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

Web Title: on the occasion of dr ambedkar birth anniversary blood donation