#Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे : ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.
रमजाननिमित्त दररोज पाच वेळची नमाज पठण करायची. पहाटेची सहेरी झाल्यावर सायंकाळी इफ्तारला रोजा सोडायचा. ईशाची अन्‌ तरावीहची नमाज पठण करायची. महिनाभर कुरआन पठण करून सर्वांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करत तीस दिवसांचे रोजे पूर्ण करून ईदचा आनंद घ्यायचा. 

त्यासाठी पंधरा दिवस अगोदरच मुस्लिम धर्मीय नागरिक ईदच्या तयारीला लागले होते. वेगवेगळ्या मशिदींमध्ये ईदच्या सामूहिक नमाज निमित्ताने शुक्रवारी तयारी सुरू होती. 

शनिवारी (ता. १६) सामूहिक नमाज अदा करण्याकरिता पुणे कॅंटोन्मेंट भागातील ईदगाह मैदान येथे साफसफाई करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम धर्मीयांच्या घरोघरी रंगरंगोटी, आकर्षक विद्युत 
रोषणाई करण्यात नागरिक व्यग्र होते. शहर व उपनगरांतील काही मशिदींवरही रोषणाई करण्यात आली आहे. 

इस्लामिक इन्फॉरमेशन सेंटरचे अध्यक्ष करिमुद्दीन शेख म्हणाले, ‘‘ईदला शाकाहारी तसेच सामिष भोजनही असते. ईदला आम्ही नातेवाइकांना घरी बोलावतो. लहान मुलांना ‘ईदी’ देतो.’’ 
मी दरवर्षी रमजानमध्ये फालुदा विक्री करतो. पूर्वी परिस्थिती सर्वसाधारण होती. आता मात्र घरची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ईदला आम्ही आवर्जून सर्वधर्मीय नागरिकांना घरी आमंत्रित करतो. शिरखुर्म्याचा आस्वाद त्यांच्यासमवेत घेतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो.
- इक्‍बाल अब्दुल करीम मोदी, फालुदा विक्रेते 

Web Title: on the occasion of eid enjoying dried fruits, buying clothes