पर्यावरण दिनानिमित्त जवानांनी काढली पवना, मुळातील जलपर्णी

रमेश मोरे
मंगळवार, 5 जून 2018

जुनी सांगवी - जागतिक पर्यावरणदिनानिमित्त केंद्रिय राखीव पोलिस दल (सी.आर.एफ) यांच्या तळेगाव व पुणे ग्रुप केंद्राच्या वतीने सांगवी व परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जुनी सांगवी, बोपोडी येथे यात सहभागी दोनशे जवानांनी पवना व मुळा नदीतील जलपर्णी काढुन नदी स्वच्छता कामास हातभार लावला. यात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संस्था व महापालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी यात सहभाग घेत जवानांना सहकार्य केले. दोनशे जणांच्या या ग्रुपने पवना घाटापासुन जलपर्णी काढण्यास सुरूवात केली. 

यानंतर मुळा नदी व बोपोडी परिसरात ही मोहिम राबविण्यात आली. सकाळी सात पासून नदीकिनारा भागात दोनशे जवान दाखल झाले. सकाळी सात ते अकरा दरम्यान दोन ट्रक जलपर्णी पात्राबाहेर काढण्यात आली. श्री विरेन्द्र कुमार टोपे उपमहानिरिक्षक ग्रुप केंद्र पुणे, श्री.एच.एस.कालस कमान्डेन्ट २४२ बटालियन ग्रुप केंद्र पुणे, धिरेन्द्र वर्मा, सचिन गायकवाड उप कमान्डेन्ट,शिजी वी.एस. संतोष भोसले, आर.सी.मिना सहाय्यक कमान्डेन्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमत्त नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे,पालिका ह प्रभाग आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर आदी उपस्थित होते. 

Web Title: on the occasion of environmental day jawan cleans pawana river