शिक्षकांना टॅब देण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पिंपरी - महापालिका शिक्षण मंडळाने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटींचा मूळ अर्थसंकल्प मंजूर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यावर अधिक भर देऊन वाढीव तरतूद केली आहे. परिणामी आधुनिक शिक्षण प्रणाली शिकवण्यासाठी शिक्षकांना ‘टॅब’ देणार आहेत. बालवाडीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट, स्काऊट- गाइड गणवेश, दप्तर आणि पीटी शूज मिळणार आहेत. मंडळाने हा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. 

महापालिका कायद्यानुसार शिक्षण मंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणे आवश्‍यक असते. मात्र, शिक्षण मंडळ सभापतिपदाची निवडणूक आणि सदस्यांच्या ‘फॉरेन ट्रीप’मुळे अर्थसंकल्प तयार करण्यास ऑक्‍टोबर महिना उजाडला. पुढील काळात कदाचित शिक्षण मंडळ बरखास्त होऊन नगरसेवकांचा समावेश असलेली ‘शिक्षण समिती’ अस्तित्वात येऊ शकते. यासाठी मंडळाच्या सदस्यांनी ‘होऊ दे खर्च’ असे धोरण राबविलेले दिसते. मंडळ प्रशासनाने १४० कोटी ४१ लाख २४ हजार रुपयांची तरतूद सुचविली आहे. मंडळाने त्यात नऊ कोटींची वाढीव तरतूद सुचविली आहे. यापूर्वी शिक्षण मंडळ बालवाडीमधील विद्यार्थ्यांना रेनकोट व दप्तर देत नव्हते, आता ‘विशेष’ तरतूद केली आहे. यात महापालिकेचा हिस्सा १०४ कोटी ८० लाख, राज्य सरकारचे अनुदान ४६ कोटी आणि इतर जमा रकमेतून २४ लाख पाच हजार रुपये गृहीत धरले आहेत. मंडळाचे 
सभापती निवृत्ती शिंदे आणि प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सादर केला आहे. 

नव्या अर्थसंकल्पात खरेदीवर भर
टॅब :     ५० लाख 
सीसीटीव्ही कॅमेरे :     १० लाख
सौरऊर्जा सिस्टिम :     ५० लाख 
बालवाडी खेळणी :     २० लाख 
ग्रीन बोर्ड :     १५ लाख 
डस्टबीन :     २० लाख 
वीजरोधक :     २५ लाख 
वॉटर फिल्टर :     ५० लाख 
वॉटर बॉटल :     ४५ लाख 
बालवाडी रेनकोट :     ३० लाख 
बालवाडी दप्तर :     २० लाख 
बालवाडी गणवेश :     १ कोटी 
बालवाडी स्वेटर्स :     ४० लाख 
विद्यार्थी पीटी शूज :     ८५ लाख  
स्काउट गाईड गणवेश :     ५ लाख 

Web Title: Offered to teachers Tab